हिंगोली – कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करत होत्या. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला धडक दिली.या अपघातामध्ये कन्याकुमारी १० ते १२ फूट उंच उडून खाली पडली अन् तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २ मार्च) रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (वय १९ वर्ष, आंबा, ता. वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर धावण्याचा सराव करीत होत्या. यावेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे ती सुमारे १० ते १२ फुट उंच उडाली अन् रस्त्यावर कोसळली. या अपघातानंतर कार चालकाने कार थांबवून तिला पाहिले, मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कारसह पलायन केले. सदर प्रकार परिसरातील आखाड्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने पाहिला. त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.समोर धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसून आली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कन्याकुमारी यांचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






