Viral Video: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये लोकायुक्तांच्या छाप्यात भाजप आमदाराच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी लोकायुक्तांनी आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना अटक केली होती, त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर आणि आमदार निवासावर छापा टाकला. यावेळी पथकाच्या हाती ही रोकड लागली.लोकायुक्तांनी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून सहा कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याशिवाय आमदार पुत्र प्रशांत मडाळ याच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता आमदारांनाही चौकशीसाठी लोकायुक्त कार्यालयाकडून समन्स बजावले जाऊ शकते.
यापूर्वी लोकायुक्तांनी आमदार पुत्र प्रशांत मडाळ याला 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडचे चेअरमनही होते, मात्र गदारोळानंतर विरुपक्षप्पा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मात्र, त्यांनी अद्याप आमदारपदाचा राजीनामा दिलेला नाही.आमदार मुलाच्या कार्यालयातून 40 लाखांव्यतिरिक्त 1.7 कोटी रुपये लोकायुक्तांना सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लाच कदाचित इतर लोकांकडून घेतली गेली असावी. लोकायुक्तांनी प्रशांत मंडल याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. भाजप आमदाराकडून सुमारे आठ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी आमदार पुत्र प्रशांत याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.”सरकारची 40 टक्के लूट सुरूच आहे. म्हैसूर चप्पल साबणाच्या सुगंधातही भ्रष्टाचार! 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक आणि आता भाजप आमदाराच्या मुलाच्या घरातून 6 कोटींची रोकड जप्त. वडील अध्यक्ष आहेत तर, मुलगा पैसे घेतो.”
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






