VIDEO : मुलाला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न फसला ; पोलिसांनी पालकाला दिला चोप, व्हिडिओ व्हायरल, चोपडा तालुक्यातील घटना.

Spread the love

चोपडा : – सध्या देशात सोशल मिडियावर दररोज काहीना काही व्हायरल होत असते. अश्यातच आता जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पकडून पोलिसांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय या शाळेच्या आवारातील हा व्हिडीओ आहे. नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. विद्यालयापासून १०० मीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला आपल्या मुलाला एक पालक कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत होता. बंदोबस्तावरअसलेल्या पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी संबंधिताला हटकले.

पहा व्हिडिओ :

मात्र, त्यानंतरही पालक कॉपी पुरवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात घुसला. त्यामुळे याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने संबंधित पालकाला पकडून पोलीस काठीने चांगलाच चोप दिला. चोप देतांना संबंधित पालक जमिनीवर कोसळला. त्याठिकाणी एका बाजूला असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार