राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा चाळीसगावकरांचा निर्धार…..

Spread the love

चाळीसगाव :- तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे 2 व 3 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. दोन एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली व तीन एप्रिल रोजी धम्म जागृती रॅली जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत अत्यंत भव्य स्वरूपात काढण्याचे नियोजन आहे. सदर संमेलनातील विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील 200 साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत.

या संदर्भातील प्रचार आणि प्रसार जिल्हा तसेच राज्यभर वेगाने सुरू आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक भरत शिरसाठ या संदर्भात सभा घेऊन तसेच जनजागृती करून प्रत्येक तालुक्यात समन्वय समिती गठित करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 4 मार्च रोजी हाॅटेल ग्रीन लीफ, चाळीसगाव येथे बौद्ध साहित्य संमेलन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये साहित्य संमेलनाची संपूर्ण रूपरेषा व त्या संदर्भातील नियोजन प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी उपस्थितांसमोर मांडले. कास्ट्राईबचे राज्य सरचिटणीस प्रभाकर पारवे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. रामचंदभाऊ जाधव (मा. शिक्षण सभापती न. पा.४०गांव ) व मा. रोशनभाऊ जाधव ( नगरसेवक तथा अध्यक्ष, भिमाचा किल्ला जिमखाना ) हे उपस्थित होते. या प्रसगी रामचंद्र जाधव, मुकेश भाऊ नेतकर ,ए. बी. मोरे सर, गणेश चव्हाण सर, गणेश निकम सर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलन नियोजन समिती सदस्य रावसाहेब जगताप यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले.


या कार्यक्रमाप्रसंगी गौतमभाऊ झालटे , समाजभूषण गौतम भाऊ जाधव , जेष्ट मार्गदर्शक आयु.शिवाजी जाधव, किरण दादा मोरे, आयु.डी.ए.मोरे, गटविकास अधिकारी आयु.पटाईत साहेब, कवी गणेश निकम ,आयु. आर. बी. जाधव सर, प्रविण मोरे सर, रेल्वे विभागाचे विनोद केदार साहेब , नितिन मोरे सर सपकाळे सर, किशोर भामरे सर तसेच चाळीसगाव शहर व पंचक्रोशीतील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी जि. समन्वय समिती मध्ये बौद्ध साहित्यिक आयु. ए. बी.मोरे सर व ए. झेड. बागूल सर यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली. अध्यक्षिय भाषाणात आयू. प्रभाकर पारवे यांनी बौद्ध साहित्य संम्मेलन यशस्वी होण्यासाठी सर्वातोपरि प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे आभार प्रोटानचे जि. अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी मानले.

या बैठकिच्या यशस्वी आयोजनासाठी मा. रोशन भाऊ जाधव यांनी सर्वस्वी जबाबदारी पार पाडली. येणाऱ्या काळात चाळीसगाव तालुका समन्वय समितीच्या माध्यमातून दोन व तीन एप्रिल रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलना संदर्भात व्यापक जनजागृती करण्याचा निश्चय करण्यात आला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार