बिहारमधील सीतामढी येथे एका लग्नात लग्न सुरू असताना वराचा स्टेजवरच हार्टअॅटॅकमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत्यूचे कारण डीजे असल्याचे मानले जात आहे.डीजेच्या मोठ्या आवाजामुळे वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.बुधवारी 2 मार्च रोजी रात्री हा प्रकार घडला. सोनबरसा ब्लॉकच्या इंदरवा गावात लग्नाची मिरवणूक आली होती.
सीतामढीतील सोनबरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदरवा गावात हा विवाह सोहळा सुरू होता. महिला गाणी म्हणत होत्या. मंचावर पुष्पहार घालण्यात आला. फोटो काढले. आणि अचानक वर बेशुद्ध पडला. लोकांनी त्याला तातडीने स्थानिक खासगी डॉक्टरांकडे नेले. येथे तपासाअंती वराला मृत घोषित करण्यात आले.
परिहार ब्लॉकच्या धन्हा पंचायतीच्या मनीथर गावातून ही मिरवणूक आली होती. सुरेंद्र कुमार असे वराचे नाव आहे. त्याच्या आई-वडिलांचे आधीच निधन झाले आहे.
तीन भावांमध्ये तो सर्वात लहान होता. तो नुकताच रेल्वेची ग्रुप-डी परीक्षा पास केली होती.लग्नाच्या वरातीवेळी मिरवणुकीदरम्यान सुरेंद्र (वर) हा वारंवार डीजेचा आवाज कमी करा किंवा डीजे काही अंतरावर ठेवा असे सांगत होते, परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही. वरमाला घालायच्या वेळीही त्याने डीजे वेगळा लावण्यास सांगितले.पण पुन्हा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लोक डीजेच्या तालावर नाचत राहिले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सुरेंद्रला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






