जळगाव : शहरातील हरीविठ्ठील नगर परिसरातील कोठारीनगरात वास्तव्यास असलेल्या ६० वर्षीय वृध्दाने घरातील वरच्या मजल्यावर दोरीने (Jalgaon News) गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २६ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर (Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)
पंढरी हरीदास चव्हाण (वय ६०) असे मृत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहितीनुसार पंढरी चव्हाण हे पत्नी व दोन मुलांसह जळगावातील कोठारीनगरात वास्तव्याला आहेत. आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करून परिवाराचा उदरनिर्वाह करत हेाते. दरम्यान रविवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी त्यांनी परिसारसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर आराम करण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. तिथे त्यांनी दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली.
नात वरच्या खोलीत गेली तेव्हा समजले
सायंकाळी सातच्या सुमारास पंढरी चव्हाण यांची नात निकिता ही वरच्या खोलीत गेली. यावेळी आजोबा दोरीच्या सहाय्याने लटकलेले दिसले. घाबरलेल्या अवस्थेत निकिती ही खाली आली. घरात तिने सदरचा प्रकार सांगितला. पंढरी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. रेवानंद साळुंखे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






