जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्व द्याल.
वृषभ :-
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.
मिथुन :-
इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल.
कर्क :-
औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल.
सिंह :-
परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल.
कन्या :-
काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. रेस,सट्टा यातून धनलाभ संभवतो. सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.
तूळ :-
जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल.
वृश्चिक :-
कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी.
धनू :-
डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलतांना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका.
मकर :-
कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.
कुंभ :-
सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरातनातेवाईक गोळा होतील.
मीन :-
मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






