मांडळ येथे अवैद्य वाळू वाहतुकीतुन झालेल्या खुनाचा मुख्य आरोपीला शिंदखेड्यातुन अटक

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर

येथून जवळच असलेल्या मांडळ येथे पांझरा नदी व नाल्यातून वाळूची अवैद्यरित्या चोरटी वाहतूक करण्यास विरोध करणाऱ्या ३५ वर्षीय जयवंत कोळी या शेतकऱ्याचा सात जणांचा जमावाने ट्रक्टरखाली चेंगरून गुप्तांगावर फावड्याने वार करून खून केल्या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता , आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही म्हणून कुटुंबीयांनी मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणला होता , त्यावरून मारवड पोलिसांनी लागलीच तीन जणांना अटक केली होती.

दुसऱ्या दिवशी परत तीन जणांना अटक करून कामगिरीची चुणूक दाखविली होती , मात्र त्यातील मुख्य आरोपी मात्र फरारच होता , दोन महिने झाले खुनातील फरार आरोपी अशोक लखा कोळी याला मारवड पोलिसांनी शिंदखेडा येथून मोठ्या शिताफीने आज दिनांक ५ रोजी अटक केली आहे.
१६ जानेवारी रोजी रात्री जयवंत यशवंत कोळी वय ३५ याने वाळू वाहतुकीस विरोध केला म्हणून सात जणांनी ट्रॅक्टर खाली चेंगरून पावडीने गुप्तांग तोडले होते.

यातील मुख्य आरोपी अशोक लखा कोळी वय ५२ हा घटना झाल्यापासून फरार झाला होता. आरोपी सुरत येथे पळून गेला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषणविभागाचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या माहितीवरून व जिल्हा पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शिंदखेडा येथे येत असल्याचे समजल्यावर डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने ,पीएसआय विनोद पाटील यांनी

हवालदार संजय पाटील ,पोलीस नाईक सुनील आगोने ,पोलीस नाईक सुनील तेली ,कॉन्स्टेबल अनिल राठोड , उज्वल पाटील ,तुषार वाघ ,दिनेश पाटील यांचे पथक नेऊन शिंदखेड्याच्या बाहेर झोपडीजवळ पथक पाठवून आरोपीवर झडप घातली व रंगेहाथ पकडून घेतले तेथून त्यास मारवड पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे . खुनाचा गुन्ह्यातील याआधी सहा आरोपीना मारवड पोलीस अटक करून जिल्हा कारागृहात रवानगी केलेली आहे , मुख्य आरोपी अशोक कोळीला अटक करून मारवड पोलिसांच्या कामगिरीने मांडळ ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणून सोडले आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार