जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ :-
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.
मिथुन :-
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
कर्क :-
तुमच्या कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातेवाईकांची मदत मिळेल.
सिंह :-
आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
कन्या :-
कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
तूळ :-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकांतील समजूतदारपणा वाढीस लागेल. दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.
वृश्चिक :-
केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.
धनू :-
प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कामाला गती येईल.
मकर :-
उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.
कुंभ :-
सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.
मीन :-
कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






