बेमोसमी वादळी वाऱ्यामुळे अमळनेर तालुक्यातील तापी पांझरा पट्यात रब्बीची पिके जमीनदोस्त, होळीच्या सणावर विरजण

Spread the love

गौरवकुमार पाटील | अमळनेर

अमळनेर तालुक्यात दिनांक ५ रोजी दुपारी व मध्यरात्री तर दिनांक ६ रोजी दुपारी ४ नंतर उशिरा वृत्त लिहेपर्यत बेमोसमी वादळी वारा , पावसाने ढगांचे व विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हजेरी लावली संपुर्ण अमळनेर तालुक्यातील हातातोंडाशी आलेल्या नगदी पिके म्हणून ओळखत असलेला कापणीवर आलेल्या उभ्या पिकांत मका,उन्हाळी ज्वारी, बाजरी ,दादर , हरभरा ह्या उभ्या पिकांचे वादळी वाऱ्याने जमीनदोस्त करून शेतकरी वर्गाला उध्वस्त केल या वादळी पावसाचा फटका जास्त प्रमाणात निम,पाडळसरे, शहापूर, तांदळी,कळमसरे ,वासरे,खर्दे,पाडसे गोरवर्धन, बोहरे,कलाली शिवारातील शेती पिकांना बसला असून असून कापणीला आलेली उन्हाळी ज्वारी,बाजरी,दादर , मका , गहू ,हरभरा पावसात ओला होत असल्याने जमिनीवर लोडलेल्या पिकांची गुणवत्ता खराब होऊन उत्पादनात ही कमालीची घट होणार असल्याची चिंता शेतकरी वर्गाला सतावू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

त्यातच जोरदार वादळ असल्याने उभी असलेला मका ,हरभरा ,बाजरी ,दादरची झाड ही मोडून पडली आहेत.होळीचा आनंदाच्या सणात विरजण पडून वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर उभा केला आहे. हजारो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या पावसात ओल्या झाल्या असून शेतीही पावसाच्या पाण्याचे भिजून झाल्याचे चित्र आहे. गत आठवड्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. रविवारी व सोमवारी झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे हाताशी आलेला घास हिरावून घेतला आहे. होळीचा सनावर शेतकऱ्याचे दिवाळे काढले असून एन लग्नसराईच्या काळात शेतकरी वर्गाचा आर्थिक कणाच मोडून काढला आहे

अनेक गांवातील शेती पिकांची नासधूस वादळी वाऱ्यामुळे मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी गहू ,दादर कापणीला सुरूवात केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर शेवटी पाणी फेरले आहे.

होळीचा सणात बळीराजाच्या आशेवर फेरले पाणी

यावर्षी कधी नव्हे ते पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन होळीच्या तोंडावर बेमोसमी वादळी वाऱ्यामुळे पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला मका,उन्हळीज्वारी,बाजरी आता पावसात भिजल्याने खराब होत आहे.

मुक्या जनावारांना चारा नाही, शेतकरी चिंतेत दिसून येत आहे ,वादळी पावसाचा फटका हा धान्याला तर बसला परंतु जनावारांच्या चाऱ्याच्या प्रश्न हा खुप मोठा असुन शेतकरी हा चिंताग्रस्त झाला आहे.परतीच्या पावसाने ज्वारी,बाजरी, मकाचा चारा हा आडवा पडला असुन चारा हा जामिनितच खराब झालेला आहे.आणि म्हणुन शेतकऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासणार असुन हॉलिकोत्सवाला बळीराजा चिंतेत आहे.

चौकट — हॉलिकोत्सव काळातच बेमोसमी वादळी वाऱ्याच्या दोन दिवस झाले धुमाकूळ घातला असल्याने अनेकांची पत्रे उडाली तर गोदामात लावलेली पत्रे सीट सह मोडून पडली तर शेत शिवारातील जुनी व बांधावरील झाडांची मोडतोड झाली आहे तर निम पाडळसरे रस्त्यावर निंबाची झाडे उलमडू पडल्याने शेतात जाणे कठीण झाले आहे म्हणून शेतकरी आपापल्या शेत हद्दीतील उलमडू पडलेली झाडे तोडून रस्ता मोकळा करून देतांना व्यस्त दिसले

हे देखील वाचा

टीम झुंजार