Video:लोकप्रतिनिधींनी विकास कामे करतांना अहंकार दाखवू नये.-आ. चिमणराव पाटील, आडगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन.

Spread the love

एरंडोल- लोकप्रतिनिधींनी विकासकामे करतांना अहंकार दाखवू नये,कारण मतदारसंघातील समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.आडगाव (ता.एरंडोल) येथे सुमारे सात कोटी रुपये खर्च करून करण्यात येणा-या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,प्रताप पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणीपुरवठा योजना,अभ्यासिका बांधकाम,सभामंडप बांधकाम,रस्त्यांचे डांबरीकरण यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. धनराज खंडेराव पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष शालिग्राम पाटील अध्यक्षस्थानी होते.यावेळी आडगाव गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

तसेच जिल्हा बँक,जिल्हा दुध संघ व अन्य स्थानिक सान्हाकारी संस्थांवर निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला.तसेच गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे उपसरपंच दिलीप पाटील यांचा ग्रामस्थांच्यावतीने आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी लोकप्रतिनिधी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असतात,मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळत असते,त्यामुळे मतदारसंघातील समस्या सोडविणे हे प्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे सांगितले.मतदारांनी देखील लोकप्रतिनिधींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले.मतदार संघाचे भवितव्य आणि समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात आपण सहभागी झालो असल्याचे सांगितले.

पहा व्हिडिओ

मतदार संघाच्या विकासकामांसाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका वर्षात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याचे सांगितले.आडगाव येथील नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील पाण्याची समस्या दूर होणार असल्याचे सांगितले.गावातील विकासकामे करतांना विरोधकांनी देखील सहकार्याची भावना ठेवून पाठींबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.वादामुळे गावाचा विकास होत नाही तर विकास खुंटत असल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शासकीय सेवेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मतदारसंघात प्रत्येक गावात अभ्यासिका बांधण्याचे आपले नियोजन असल्याचे सांगितले.जिल्हा दुध संघासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जात पात न मानता सर्व सामान्य कार्यकर्त्याना उमेदवारी देवून त्यांना निवडून आणले याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या आडगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करीत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले. मतदारसंघातील सर्व वंचित आणि गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून मतदारांना खोटे आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करीत असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.उपसरपंच दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.भारत पाटील यांनी आभार मानले.आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,प्रताप पाटील,दुध संघाचे संचालक दगडू चौधरी यांचेसह प्रमुख पाहुण्यांचे आडगाव येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

गावातून आमदार चिमणराव पाटील यांचेसह पदाधिका-यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.गावातील महिलांनी ठिकठीकाणी आमदार पाटील यांचे औक्षण केले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील, अमोल पाटील,दुध संचाचे संचालक दगडू चौधरी, रावसाहेब भोसले,शिक्षक पतपेढीचे संचालक भगतसिंग पाटील,मानद सचिव जगदीश पाटील यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,माजी सभापती डॉ.दिनकर पाटील,गबाजी पाटील,कासोद्याचे सरपंच महेश पांडे,माजी सरपंच सुदाम राक्षे,सरपंच सुनील भिल,सदस्य प्रल्हाद पाटील,रवींद्र महाजन,विजय मोरे, गुलाब पाटील,भिवसन सातपुते,शांताराम पाटील, गुलाबराव साबळे,भूषण महाजन,धीरज पाटील,भैया वनवे,डॉ.कैलास पाटील,मयूर महाजन,गोविंदा बिर्ला यांचेसह परिसरातील सरपंच,सदस्य,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम झुंजार