प्रतिनिधी l अमळनेर :- शहरातील पाटील कॉलनी भागातील एका घरातून सुमारे दीड लाख रुपये मुद्देमाल सोने व रोख रक्कम भर दिवसा चोरी झाल्याची घटना दि.7 रोजी दुपारी 12 ते 3 ह्या दरम्यान घडली असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक जगन्नाथ सूर्यवंशी रा.प्रभूरंग रेसिडेन्सी पाटील कॉलनी हे दि.7 रोजी दुपारी शालकाच्या लग्नानिमित्त कुटूंबासह पैलाड परिसरात गेले होते.तेथून दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांची आई घरी परत आली असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
अज्ञात चोरट्याने घरातील 35 ग्रॅम वजन असलेली 80 हजार 500 रुपयांची सोन्याची माळ,10 ग्रॅम वजनाचा 23 हजार रुपयांचा सोन्याचा शिक्का,साडे सहा ग्रॅम 14 हजार 950 रुपयांचे सोन्याचा दागिना,28 हजार रुपये रोख,तर दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले सहा हजार रुपये रक्कम असा एकूण 1 लाख 52 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

हे देखील वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






