10 सेकंदात होत्याचं नव्हतं! पत्त्यासारखी कोसळली इमारत; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

Spread the love

नवी दिल्ली : इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. बाहेरून अगदी चकाचक दिसणारी अशी ही इमारत क्षणात जमीनदोस्त झाली आहे. अवघ्या 10 सेकंदात चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. दिल्लीतील ही दुर्घटना आहे. ज्याचा व्हिडीओही समोर आला आहे. दिल्लीतील भजनपुरा परिसरातील ही इमारत आहे.

जी अगदी रस्त्याच्या शेजारी आहे. दिसायला तशी ही बिल्डिंग अगदी नीट दिसते आहे. त्यामुळे ही बिल्डिंग कोसळेल असा विचारही कुणी केला नसेल. पण ते झालंच ही बिल्डिंग रस्त्यावर कोसळली.
अवघ्या 25 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील शेवटची 10 सेकंद काळजात धडकी भरवणारी आहेत. एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

एएनआयने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी हा व्हिडीओ बनवला आहे, ज्याची पुष्टी पोलिसांनीही केली आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर बिल्डिंग कोसळण्यासाधी बिल्डिंगच्या खाली स्पार्क होतानाही दिसतं आहे.ज्यावेळी बिल्डिंग कोसळली तेव्हा रस्त्यावर तरी कुणी दिसत नाही आहे. पण या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही माहिती नाही.दरम्यान या ट्विटर प्रतिक्रिया देताना एका युझरने जीवितहानी झाली नाही, असं सांगितलं आहे.

हे देखील वाचा


टीम झुंजार