मुंबई :- सध्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह चोरीचे प्रकारही अत्याधुनिक झाले आहेत. निरनिराळ्या पद्धतीने ही फसवणूक केली जात आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे बँक केवायसी. मुंबई येथे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला सायबर चोरांनी 1 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.या अभिनेत्रीचं नाव नगमा मोरारजी असं आहे. अभिनेत्री ते नेता अशी कारकिर्द असलेल्या नगमा हिने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, नगमा हिच्या मोबाईलवर 28 फेब्रुवारी रोजी एक मेसेज आला. त्यात तिला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सांगण्यात आलं. ते न केल्यास त्याच रात्रीपासून त्यांचं मोबाईल नेट बँकिंग बंद केलं जाईल, असं मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
नगमा हिने त्या लिंकवर क्लिक केलं त्यानंतर तिच्याकडे ओटीपी मागण्यात आला. नगमा हिने ओटीपी टाकल्यानंतर तिच्या खात्यातून 99,998 रुपये काढले गेले. यानंतर तिने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आयपीसी 420, 419, 66सी आणि 66डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही नगमाप्रमाणेच श्वेता सुरेश मेमन हिलाही बँक केवायसीच्या नावाखाली 60 हजारांचा गंडा घालण्यात आला.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






