Curry Patta Fayde: कढीपत्त्यांच्या मदतीने पदार्थाला आणखी चांगली टेस्ट मिळते. अनेक लोक कढीपत्ता बाजारातून विकत आणतात तर काही घरीच याचं झाड लावतात.
Curry Patta Fayde: भारतीय किचनमध्ये कडीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. खासकरून साऊथ इंडियन डिशेसमध्ये याचा जास्त वापर केला जातो. कढीपत्त्यांच्या मदतीने पदार्थाला आणखी चांगली टेस्ट मिळते. अनेक लोक कढीपत्ता बाजारातून विकत आणतात तर काही घरीच याचं झाड लावतात.
आरोग्याचा खजिना आहे ही पाने
कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शियम, आयरन, कॉपर, विटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. चला जाणून घेऊ सकाळ जर 3 ते 4 पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो.
1) डोळ्यांसाठी फायदेशीर
कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नाइट ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळला जाऊ शकतो. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. याने डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.
2) डायबिटीसमध्ये फायदेशीर
डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हाइपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.
3) डायजेशन होतं चांगलं
ही पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.
4) इंफेक्शनपासून बचाव
कढीपत्त्यामध्ये अॅंटीफंगल आणि अॅंटी-बायोटीक गुण आढळतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. याने अनेक आजारांचा धोका टाळला जातो.
5) वजन होईल कमी
ही पाने खाल्ल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






