जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.
वृषभ :-
कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.
मिथुन :-
जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.
कर्क :-
घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.
सिंह :-
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.
कन्या :-
पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.
तूळ :-
कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.
वृश्चिक :-
पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
धनू :-
नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.
मकर :-
कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.
कुंभ :-
बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.
मीन :-
सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






