धरणगावचे लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल२५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

नायब तहसीलदार जयंत भट ,कोतवाल राहुल शिरोळेला लाच प्रकरणी अटक

गौरवकुमार पाटील / अमळनेर

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई न करण्यासह वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदाराला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धरणगावचे नायब तहसीलदार जयंत पुंडलिक भट रा.एरंडोल व कोतवाल राहुल नवल शिरोडे रा.पाळधी ता.धरणगाव यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई न करण्यासह वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी हा सापळा यशस्वी केला.त्यांच्या टीमचे सहकार्यातून कारवाई यशस्वी झाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून लाचखोर पकडून कारवाई करत धडाका चालूच ठेवला आहे

सापळा पथक- एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने. यांनी कारवाईसाठी केली मदत पथक- स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.

टीम झुंजार