मुरादाबाद :- लग्नात भांडणाच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला लग्नानंतरच्या अशाच एका भांडणाची बातमी सांगणार आहोत. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.उत्तर प्रदेश मधील एका जिल्ह्यातून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इथे लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरदेवाला नवरीची मागणी पूर्ण न करणे महागात पडले आहे.लग्नाच्या पहिल्या रात्री गावातील प्रथेनुसार दिल्या जाणाऱ्या पैशांवरुन हे सगळं प्रकरण घडलं. नववधूच्या इच्छेनुसार पैसे न मिळाल्याने तिनं थेट संसारच मोडण्याचा निर्णय घेतला.
तुम्हाला हे प्रकरण विचित्र वाटत असेल. मात्र नवरीला मनवता मनवता नवरदेवाला चांगलाच घाम फुटला. 20 हजार रुपयांची मागणी केली-
हे संपूर्ण प्रकरण मुरादाबाद दिलारी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील आहे. या गावातील एका तरुणाने आठवडाभरापूर्वीच जवळच्या गावातील मुलीशी लग्न केले होते. लग्नात दोन्ही पक्षांनी खूप खर्च केला. मात्र लग्नानंतर पहिल्या रात्रीच दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला.पत्नीने पतीला मुंह दिखाईमध्ये २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पतीने सात हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. जे वधूने घेण्यास नकार दिला. मग काय, लग्नाच्या पहिल्याच रात्रीच दोघांमध्ये वाद सुरू झाला.

बायकोला पटवायला घाम फुटला-
यानंतर, नववधू तिच्या माहेर गेली. घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाइकांना सांगितला आणि तिला सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. यानंतर या प्रकरणाची माहिती वधूच्या पतीला देण्यात आली.
दोन्ही बाजूच्या लोकांनी आणि नवरदेवाने वधूला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून या प्रकरणी पंचायत बोलावण्यात आली. बरेच जणांनी वधूला समजावून सांगितले. प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हे प्रकरण मिटले आणि मुलगी पतीसह सासरच्या घरी जाण्यास तयार झाली.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






