सोयगाव मंडळात अवकाळी वादळाच्या दुसऱ्यांदा तडाखा; काढणीवर आलेली पिके आडवी; रब्बी हंगाम हातातुन गेला

Spread the love

सोयगाव,(साईदास पवार)..सोयगाव मंडळातील अठरा गावांना बुधवारी रात्री अवकाळीच्या सरीसह दुसऱ्यांदा वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्यामुळे सोयगाव मंडळातील अठरा गावातील रब्बीच्या मका ज्वारी सूर्यफूल आदी पिके वादळी वाऱ्याच्या तडाख्यात आडवी झाली असून खरिप हंगामाचा जनावरांना शेतात उभा करून ठेवलेला चारा अवकाळीच्या पावसाने भिजला आहे त्यामुळे आगामी उन्हाळ्यातील जनावरांच्या चाऱ्याचे पशुपालकांचे नियोजन बिघडले आहे

सोयगाव मंडळातील अठरा गावांना बुधवारी रात्री अवकाळी पावसाचा सरी सह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे बुधवारी रात्री अकरा वाजेनंतर अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला यामध्ये ऐन कापणी वर आलेल्या मका ज्वारी बाजरी आणि सूर्यफूल पिकांची नुकसान झाले असून आठवडा भरात दुसऱ्यांदा या महसूल मंडळाला अवकाळी व वादळी वाऱ्याचा फटका बसल्यानें शेतकरी हताश झाला आहे दरम्यान रब्बीच्या हंगामाचा तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या संकटांमुळे हातातून निसटला आहे त्यामुळे आता तरी कृषी व महसूल विभाग सदोष पंचनामे करून नुकसान भरपाई देतील का अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे

—-सर्वाधिक फटका जरंडी भागाला
जरंडी भागातील नऊ गावांचे शेतीक्षेत्र डोंगराच्या पायथ्याशी आहे बुधवारी रात्रीचा वादळी वाऱ्याची दिशा डोंगर भागातून अधिक होती त्यामुळे जरंडी, निंबायती,रामपुरा तांडा बहुलखेडा तिखी उमरविहिरे निमखेडी घोसला नांदगाव तांडा या नऊ गावात नुकसानी चा तडाखा तीव्र आहे दरम्यान चार दिवसांपूर्वीही याच भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे दुसऱ्यांदा या भागात रब्बीच्या पिकांना नुकसान सोसावे लागत आहे
——सोयगाव परिसरात बुधवारी रात्री अवकाळीच्या सरी सह वादळी वाऱ्याचा तडाखा बसून गुरुवारी दिवस भर ढगाळ वातावरण होते त्यामुळे सोयगाव परिसरात सूर्यदर्शन झालेच नाही या बदलत्या वातावरणामुळे सोयगाव वासीयांना उन्हाळा हिवाळा की पावसाळा असा संभ्रम झाला त्यामुळे गुरुवारी नागरिक स्वेटर छत्री व पावसा पासून संरक्षण करणारी कपडे परिधान करून होते….

हे देखील वाचा

टीम झुंजार