ओडिशा :- सध्या देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना मध्ये प्रचंड वाढ होत आहे अशीच एक घटना ओडिशा मध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरुने भावाचा राग आल्याने आपल्या गर्भवती वहिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कहर म्हणजे यावेळी तिची जाऊबाईने मोबाईलवर त्याचे चित्रीकरण केले आहे.ओडीशाच्या नबरंगपुर येथील ही घटना आहे. येथील गवंडीने पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आहे. एवढेच नाही तर कहर म्हणजे घटनेच्यावेळी आरोपीची पत्नी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत राहिली. वास्तविक गवंडी पीडितेचा शेजारी होता आणि आरोपीचे तिच्या पतीसोबत काही वाद होते. या भांडणामुळे सूड घेण्यासाठी आरोपीने भावाच्या बायकोवर बलात्कार केला.
बलात्कारानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि सूड घेण्याचेही लिहिले. सध्या या संपूर्ण प्रकरणात 38 वर्षीय गवंडी आणि त्याची आशा वर्कर असलेली 35 वर्षीय पत्नी हिला अटक करण्यात आली आहे. पीडिता नात्याने आरोपीची वहिनी लागते. कुटुंबियांने गेल्या सोमवारी पोलिसांना माहिती दिली जेव्हा पिडीतेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस स्थानकाचे अधिकारी दीपक कुमार लेंका याांनी सांगितले की, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






