जळगावातील पुतळा हटविण्याच्या कार्यवाहीची चौकशी करून दोषीवर रा सु कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा

Spread the love

पाळधी :- तालुका धरणगाव येथील धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूर क्षेत्राचे ए पी आय प्रमोद कठोरे यांना रा कॉ सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्या नेतृत्वात जळगाव सिव्हिल हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा हटवण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर कारवाईची चौकशी करून दोशींवर रा सु कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे तसेच याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची जिल्हा बाहेर बदली करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले .

सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री जळगाव यांच्याकडेही पाठविण्यात आली.यावेळी अरविंद मानकरी यांच्यासह अशोक नन्नवरे, अक्षय अहिरे, सचिन सपकाळे ,शीलवर्धन नन्नवरे ,निंबा गायकवाड ,शरद नन्नवरे ,नरेंद्र भालेराव, ज्योतीबाई सोनवणे ,बेबाबाई नन्नवरे, मिनाबाई साळुंखे, मायाबाई ननवरे, सीमाबाई सोनवणे, अलकाबाई गायकवाड, उज्वल सपकाळे, सुमित नन्नवरे ,समाधान सोनवणे, मुकेश गायकवाड, अमोल साळुंखे, संजय जाधव, संघर्ष नन्नवरे ,किरण बिराडे, यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टीम झुंजार