Viral video: कुंकू लाविलं रमानं…भीमगीताच्या गाण्याची परदेशी तरुणीला भूरळ-

Spread the love

Viral video: सध्या तरुणाई रॅप साँग आणि हॉलिवूड साँगकडे जास्त आकर्षित होताना दिसून येत आहे.एमसी स्टॅन आणि एमिवे सारखे रॅपर तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करत आहेत.असं असताना देखील काही अशी लोकं आहेत, जे अजूनही मराठी गाण्यांना प्राधान्य देतात.
यात केवळ भारतीय नव्हे तर परदेशी लोकांचाही समावेश आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. तसेच भिमगीते देखील प्रसिध्द आहेत. यातीलच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे कुंकू लावीलं रमानं. आता एखाद्या मराठी भाषिकाने हे गाणं म्हटलं तर नवल वाटणार नाही.
मात्र एका विदेशी तरुणीने हे गीत गायलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Viral video



या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका परदेशी तरुणीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमात तिने हे गाणं म्हंटलं आहे.
विशेष म्हणजे तिने हे गाणं त्याच सुरात आणि तालात म्हटलं आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार