IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी नोकरी कोणाला नको आहे? आजही मोठ्या संख्येने लोक सरकारी नोकरीची तयारी करतात. त्यातही तरुणांमध्ये बँकेबाबत मोठी स्पर्धा आहे. आता आम्ही बँकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर देणार आहोत.वास्तविक आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजरची नोकरी समोर आली आहे. जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
जर तुम्हाला आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला www.idbibank.in आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 28 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे. या पदासाठी अर्जदाराला एप्रिल 2023 रोजी ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. आयडीबीआय बँकेने दिलेल्या माहितीनुसार असिस्टंट मॅनेजरच्या 600 पदांवर भरती केली जाणार आहे.
आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजरसाठी पात्रता निकष काय आहेत?
आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय २१ ते ३० वर्षादरम्यान असावे. त्याच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला बँकिंग वित्तीय सेवा किंवा विमा क्षेत्रातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
किती पगार मिळणार?
जर उमेदवाराची आयडीबीआय बँकेत निवड झाली तर त्याला दरमहा 36,000 ते 63,840 रुपये वेतनश्रेणीवर आधारित वेतन मिळेल. याशिवाय इतर भत्तेही दिले जातील.
आयडीबीआय बँक असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज कसा करावा?
१)सर्वप्रथम तुम्हाला आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे idbibank.in.
२)आता करिअर टॅबवर क्लिक करा.
३)आता असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) भरती – 2023-24 अर्ज लिंकवर क्लिक करा.
४)आता मागितलेली माहिती भरा.
५)अर्ज भरल्यानंतर शुल्क भरावे.
६)आता अर्जाची प्रिंटआऊट घ्या.






