Viral Video : आरती सुरू असताना मंदिरात शिरल साप, महिलेने साप पकडला अन्…

Spread the love

Viral Video : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे असे असतात जे आपल्या डोळ्यांनी पाहूनही त्यावर विश्वास बसत ठेवणं कठीण जातं.प्राण्यांचेही काही फनी व्हिडीओ आहेत जे आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपल्याला भीती वाटते. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक महिला साप घेऊन नाचताना दिसत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. छिंदवाडा येथील जाम सांवली हनुमान मंदिरात आरती चालू होती. आरती सुरू असताना सर्वजण भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. अचानच तिथे एक साप शिरतो आणि सर्वजण घाबरतात . मात्र तिथे एक महिला न घाबरत साप घेते नाचू लागल्याचं दिसत आहे. सापाला घेऊन नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार