जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
दिवस दगदगीत जाईल. थोडा वेगळा विचार करून पहावा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी. कामात काही बदल करून पहावा लागेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.
वृषभ :-
अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. रेस, जुगार यांची आवड पूर्ण कराल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनाजोगी खरेदी करता येईल. सर्वांना आपलेसे कराल.
मिथुन :-
कौटुंबिक कामात गढून जाल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रासौख्य मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. जवळचे मित्र भेटतील.
कर्क :-
चारचौघात कौतुक केले जाईल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. तुमची अरसिकता दूर सारावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह :-
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
कन्या :-
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. मुलांच्या मताचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.
तूळ :-
मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. पित्त विकार बळावू शकतात. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल.
वृश्चिक :-
हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल. मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतून उत्तम लाभ मिळेल.
धनू :-
बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.
मकर :-
सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा.
कुंभ :-
सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. बागकामात मन रमेल. अचानक धनलाभ संभवतो.
मीन :-
बौद्धिक कौशल्य दाखवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या गप्पा माराल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






