सामूहिक राजीनामा देण्याची तयारी; तोडगा न निघाल्यास ‘भूक हरताळ’
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काही ठरावीक डॉक्टरांची मर्जी राखण्यासाठी प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६४ केल्याने शेकडो कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जारी केलेले प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६४ हे परिपत्रक मागे घेण्यात यावे यासाठी ४ मार्च रोजी पालिका मुख्यालयातील आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. त्यावेळी आयुक्तांनी पुढील ७ दिवसांत चर्चा करून परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र १५ दिवस उलटले, तरी अन्यायकारक परिपत्रक मागे न घेतल्याने कनिष्ठ डॉक्टरांची सहनशीलता संपली असून, डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शेकडो कनिष्ठ डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवार २१ मार्चपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही निर्णय न घेतल्यास सर्व रुग्णालयात चक्काजाम, त्यानंतर भूक हरताळ आणि टोकाची भूमिका म्हणजे सामूहिक राजीनामा देण्याची तयारी, असा इशारा कनिष्ठ डॉक्टरांच्या शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिला आहे.

आंदोलनाचे स्वरूप:-
■ धरणे आंदोलन २१ मार्च, सकाळी ९.३० वाजता
■ साखळी बेमुदत उपोषण
■ सर्व रुग्णालयात ठिय्या चक्का जाम आंदोलन
■ शेवटचा उपाय म्हणून ३० मार्चपासून सामूहिक राजीनामे देणार
■ एप्रिलपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन
■ कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवणार
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






