कल्याण (प्रतिनिधी) :- एकच मिशन जुनी पेंशन च्या नाऱ्याने आज कल्याण दुमदुमले. कल्याण पेंशन तालुका समन्वय समिती ने आयोजित केलेल्या आजच्या बाईक रॅली मध्ये १२०० शिक्षक शिक्षकेतर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक व विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.

कल्याणमधील पंचायत समितीच्या कार्यालयापासून प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, खडकपाडा मार्गे प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली.
कल्याण तालुका पेंशन समितीच्या माध्यमातून
विविध शिक्षक संघटना, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.
या रॅलीत राहुल परदेशी अनिल बोरनारे, अनिल सांगळे, दिपक पाटिल, राजेश वेखंडे, अरूण बोंबे रविंद्र देवकर, दिपक धूमाळ, पंडीत गायकवाड, अनिता साळवे, गिरीष ठाकरे, संदिप गढरी, विनायक जाधव, कमलाकर पवार यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार सौ. रिताली परदेशी यांनी निवेदन स्विकारले.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






