‌नवीन वर्षात सलग २१ दिवस ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयोग करा आणि अगणित लाभ मिळवा!

Spread the love

Gudi Padwa 2023: नवीन वर्ष म्हटल्यावर नवा उत्साह, नवी आव्हानं आपल्याला खुणावतात, त्या पूर्तीसाठी हा प्रयोग केलाच पाहिजे.

सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो.

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. धर्मग्रंथ, वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य मिळते. तुमचा संपूर्ण दिवस उर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते

‘लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे’ असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते.

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी असे सांगितले जाते. आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठवले जाते. तसेच गायक ब्रह्म मुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो.

पशु, पक्षी, निसर्गदेखील ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतो. मनुष्यानेदेखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली, तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच, शिवाय ताणतणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल. विश्वास बसत नसेल, तर किमान २१ दिवस ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा…!

  • धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठून उपासना पाठ केल्याने आपली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया, ब्रह्म मुहूर्त कधी होतो आणि ब्रह्म मुहूर्ताचे महत्त्व काय आहे आणि यावेळी उठण्याचे फायदे काय आहेत.

  • ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ, म्हणजे देवाचा काळ. हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.

  • ब्रह्म मुहूर्ताचे महत्त्व – प्राचीन काळी ऋषी-मुनी ब्रह्म मुहूर्ताला ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानत असत. धार्मिक शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर केलेली देवपूजा लवकर फळ देते. यावेळात झोपणे निषिद्ध मानले जाते.

  • मुहूर्तावर उठण्याचा लाभ – – धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात. त्यावेळी आपण उठलो असल्यास आपल्या घराची प्रगती होते.

  • जेव्हा एखादी व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठते, तेव्हा वातावरणात पसरलेली सकारात्मक ऊर्जा मानवी शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे मनात चांगले विचार निर्माण होतात.

  • ब्रह्म मुहूर्तामध्ये केलेले ध्यान आत्मविश्लेषण ब्रह्मज्ञानासाठी सर्वोत्तम मानले जाते.

  • ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने शारीरिक शक्ती वाढते. तसेच सहनशीलता वाढते.

  • ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीला उत्तम आरोग्य, शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. याशिवाय जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठतो तो जीवनात अधिक यशस्वी होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. झुंजार न्युज त्याची हमी देत नाही.)

हे वाचलंत का ?

टीम झुंजार