शेतकरी सहवेदना यात्रेनिमित्त शेतकऱ्यांनी केले आंदोलन
गौरवकुमार पाटील / अमळनेर
शासनाच्या जाचक निर्णयामुळे व नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी २० मार्चला मारवड येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एक दिवसाचे अन्नत्याग उपाेषण केले.
या वेळी मारवडसह गोवर्धन, कळमसरे, पाडळसरे, बोहरे, डांगरी, करणखेडा, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी एक दिवस अन्नत्याग उपोषण केले.
या उपोषणात माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, दिलीप पाटील, बाबुराव पाटील, मधुकर पाटील, दगडू वाघ, एकनाथ बाविस्कर, हरिभाऊ मारवडकर, काशिनाथ पाटील, आनंदा पाटील, उत्तम पाटील, अशोक नीळ, मधुकर पाटील, दिलीप बागुल, राजेंद्र जाधव, सुनील साळुंखे अादी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला हाेता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदना म्हणून प्रारंभी मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य म्हणून शासनाने कर्जमाफीसह आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

शेतकरी सहवेदना यात्रेनिमित्त मारवड येथील सभेत संदीप घोरपडे यांनी अहिराणी भाषणातून तर अमर हबीब व शेतकरी नेते राजीव बसर्वेकर यांनी मार्गदर्शन केले. टिडीएफचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे यांनी सर्व शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून शेतकऱ्यांचा ठराव संमत करून पाठिंबा दिला.
हे देखील वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






