ए.सी.बी.ची कारवाई, जिल्हा पोलिसदलात खळबळ !
फैजपूर : पत्त्याच्या क्लबवर कोणतीही कारवाई न करता क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली होती. ती स्वीकारताना फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदारासह दोन पोलीस नाईक जाळ्यात अडकले आहे. तीन्ही संशयित आरोपीविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. फैजपूर येथे आज २४ मार्च शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. यात हेमंत वसंत सांगळे (वय ५२, वर्ष रा. भारत एंटरप्रायजेस मागे, फैजपूर), किरण अनिल चाटे, (४४, रा. विद्या नगर, फैजपूर) आणि महेश ईश्वर वंजारी (३८ रा. लक्ष्मी नगर, फैजपूर) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
या घटनेतील तक्रारदाराचा यावल तालुक्यातील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. हा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे सुप्रिमो असलेले सहायक फौजदार हेमंत वसंत सांगळे आणि त्यांचे सहकारी पोलिस नाईक किरण अनिल चाटे या दोघांनी तक्रारदाराकडे एकुण चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. ठरल्यानुसार पत्त्याचा क्लब चालक तक्रारदार हे सहायक फौजदार हेमंत सांगळे आणि पोलिस नाईक किरण चाटे या दोघांची भेट घेण्यासाठी फैजपूर पोलिस स्टेशनला गेले होते.सहायक फौजदार हेमंत सांगळे यांनी तक्रारदाराकडे कामाची व पैशाची बोलणी केली.

त्यानंतर त्यांनी पोलिस नाईक किरण चाटे यांना फोन लावून किती पैसे घ्यायचे याबाबत बोलणी केली आणि तक्रारदाराकडे फोन देवून आपसात बोलणे देखील करुन दिले. तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे यांच्याकडे देण्यास चाटे यांनी तक्रारदाराला सांगितले. त्या चार हजार रुपयांची विभागणी देखील उघड करण्यात आली. सहायक फौजदार आणि पोलिस नाईक यांचे मिळून तिन हजार आणि गोपनीय शाखेतील पोलिस नाईक महेश वंजारी याचे एक हजार असे एकुण चार हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले.लाचेची चार हजार रुपयांची रक्कम सहायक फौजदार हेमंत सांगळे सह दोघे पोलिसांना अटक केली आहे.

या कार्यवाहीसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. ईश्वर धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना. किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर. पो. कॉ. राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






