मुंबईः- मित्रासोबत फिरायला गेलेल्या वीस वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी यश शिंदे आणि धीरज सोनी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.पीडित युवती आपल्या मित्रासोबत विरार पूर्वमध्ये असलेल्या साईनाथ नगर येथील डोंगराळ भागात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेली होती.
यावेळी जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेत तेथे दबा धरून बसलेल्या दोघांनी युवतीचे फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी युवतीच्या मित्राला मारहाण करत पट्ट्याच्या मदतीने झाडाला बांधून ठेवले होते. शिवाय, त्याचे कपडे देखील काढण्यात आले होते. त्यानंतर आरोपींनी या युवतीवर अत्याचार केला. तिचा मित्र नग्न अवस्थेत डोंगराखाली आला असता काही नागरिकांनी त्याला पाहिले व त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

पीडित युवती व तिच्या मित्राने विरार पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह, लूट, मारहाण अशा विविध कलमन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करून आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






