विखरण येथील 36 वर्षीय युवकाची आत्महत्या. सहा दिवसापासून मृत्यूशी देत होता झुंज.

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील विखरण येथे दिनांक 20 मार्च रोजी छत्तीस वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येच्या प्रयत्न केला होता. गेल्या सहा दिवसापासून हा युवक मृत्यूशी झुंज देत होता अखेर दिनांक 25 मार्च रोजी या युवकाचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 20 मार्च रोजी निलेश बाबुराव पाटील वय 36 वर्षे हा तरुण शेतकरी दिवसभर शेतात काम धंदा करून सायंकाळी घरी येताना शेतातूनच काहीतरी विषारी औषध पिऊन घरी आला. घरच्या लोकांच्या लक्षात आल्याबरोबर तात्काळ त्यांनी निलेश पाटील यास एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरानी प्रथमोपचार करून त्यास जळगाव जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले.

गेल्या सहा दिवसापासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती अखेर दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाचे सीएमओ निरंजन देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्थानकात दिनांक 26 मार्च रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जितेंद्र तायडे करीत आहे
दरम्यान निलेश पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तसेच आई वडील भाऊ यांच्यापासून तो वेगळा राहत होता. निलेश पाटील यांनी आत्महत्या का केली? गेल्या सहा दिवसापासून विखरण गावात चर्चेचा विषय ठरला होता.

हे देखील वाचा


टीम झुंजार