जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.
वृषभ :-
धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.
मिथुन :-
काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.
कर्क :-
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.
सिंह :-
व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
कन्या :-
मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.
तूळ :-
अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण आजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अतिघाई उपयोगाची नाही.
वृश्चिक :-
स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
धनू :-
हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
मकर :-
काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.
कुंभ :-
कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.
मीन :-
नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






