खडके खूर्दे येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन
एरंडोल(प्रतिनिधी):- प्रत्येक गावामध्ये जातीपातीचे राजकारण केले जात असल्याने व शेतकऱ्यांना या राजकीय पटलावरती अडकून ठेवण्याचे कटकारस्थान होत असून त्यामुळे शेतकरी हा शेती आणि शेती संबंधित विकासात्मक विकासा पासून दुरावला जात असून त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाहीये म्हणून शेतकऱ्यांनी जात-पात व राजकारण सोडून शेतकरी म्हणून संघटित होणे आवश्यक आहे तरच शेतकरी हा टिकेल अन्यथा त्याचा टिकाव लागणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाला पारोळा तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी मालखेडा तालुका एरंडोल चे मार्गदर्शक तथा महासचिव गणेश पाटील व महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गावाचे जेष्ठ मार्गदर्शक पीजी पाटील सर यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं संघटन व्यवस्थित रित्या होत नसल्याने व दिशाहीन पद्धतीने होत असल्याने त्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात व सानिध्यात एका छत्रछायेखाली येऊन सर्वांगीण पद्धतीने संघटन करणे आवश्यक आहे असे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर गावाचे सरपंच तुकाराम पाटील, उपसरपंच अशोक पाटील, माजी सरपंच साहेबराव पाटील, आनंदा पाटील, पोलिस पाटील चंद्रकांत पाटील,गावातील नितीन पाटील, ईश्वर पाटील, इंद्रसिंग पाटील, अर्जुन पाटील, अनिल पाटील, विठ्ठल सोळंकी, वेडू पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, अमरसिंग राजपूत, रामचंद्र पाटील, नाना पाटील यांच्या सह सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटी चेअरमन, सदस्य व जेष्ठ नागरिक, युवा वर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची खडके खुर्दे गावात शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे मार्गदर्शक म्हणून पी.जी.पाटील सर,शाखाध्यक्ष सुनील वेडू पाटील,कार्याध्यक्ष म्हणून विलास गुलाब पाटील,माहिती प्रमुख म्हणून सागर गोकुळ पाटील, उपाध्यक्ष म्हणून अर्जून अशोक पाटील,संपर्क प्रमुख म्हणून नामदेव संतोष पाटील, खजिनदार म्हणून आकाश तुकाराम पाटील उपस्थितांचे आभार सुनील पाटील यांनी मानले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






