एरंडोल (वार्ताहर)
५ मे १९७० रोजी परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी गुजरातच्या नारगोल येथे ब्रम्हांडाचे सहस्रार उघडून सहजयोगाची सुरुवात केली.
या घटनेमुळे साधकांना गिरी कंदरात न राहता संसारात राहूनच सर्वसामान्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे शक्य झाले. जगद्गुरु श्रीमदआद्यशंकराचार्य यांनी वर्णिलेली सलीलम सलीलम थंड थंड चैतन्याची जाणीव साधकांना मिळू लागली आणि त्यानंतरची प्रगती साधक साधू लागले.
५ मे १९७० रोजी सुरू झालेला सहजयोग आज संपूर्ण विश्वातील सर्व जाती धर्माचे लोक आपापला धर्म सांभाळून करीत आहेत. साधारणता जगभरातील १२० पेक्षा जास्त देशांमध्ये सहजयोगी साधक आहेत आणि विशेष म्हणजे ते कुठल्याही धर्माचे असो पण ते भारतीय रीतीरीवाज, भारतीय परिधान, भारतीय नृत्य, भारतीय संस्कृती पूर्णपणे अनुसरतात,देवी देवतांची स्तुती करतात, श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणतात, अगदी मुस्लिम सुद्धा, श्री गणेशांचे भक्त असतात मराठी, संस्कृत, हिंदी भजनं म्हणतात,ही फार मोठी गोष्ट आहे.

कमल लॉन्स एरंडोल येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व सहज योगी साधकांनी एकत्रितपणे येऊन परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. तदनंतर कलश पूजन झाले. श्री गणेश पूजन, श्री देवी पूजन करून श्री आदिशक्तीची १०८ नाव घेऊन अशी आदिशक्तीची पूजा करण्यात आली. जळगाव जिल्हा भरातून ७५० सहजयोगी बंधू-भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






