चाळीसगाव (प्रतिनिधी)- माहिती अधिकार प्रचार प्रसार कार्यकर्ते तथा पत्रकार गफ्फार नजीर शेख यांच्या तक्रारीची दखल घेत शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांना रुग्ण हक्काची सनद व दरपत्रक ( द चार्टर ऑफ पेंशट राईटस) ची माहिती दर्शनी भागात लावण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आदेश.
गफ्फार नजीर शेख, चाळीसगांव यांनी आपले सरकार पोर्टवर दि. २७ मार्च २०२३ रोजी तक्रार केलेली होती, त्यात त्यांनी प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण हक्काची सनद व दरपत्रक ( द चार्टर ऑफ पेंशट राईटस) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायदयाने बंधनकारक आहे.
परंतु चाळीसगांव शहरात बहुतांश खाजगी रुग्णालयात रुग्णांची हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुन २०१९ मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काची सनद खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात आदेश जारी केले आहे. राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने सप्टेंबर २०२० आणि मे २०२१ मध्ये विषयी आदेश निर्गमित केलेले आहे.

या रुग्ण हक्काच्या सनद मध्ये नागरिकांना प्राप्त झालेले अधिकार, आजाराच्या प्रकारची माहिती मिळण्याचा, हक्क तपासण्याचे परिणाम, अपेक्षित खर्च,तपासण्याचे अहवाल व सविस्तर बिले, मुलभुत हक्क या सारखे अनेक रुग्ण हकांचा रुग्ण हक्काच्या सदर सनदमध्ये समावेश आहे. तरी आपल्या संस्थेत व चाळीसगांव शहरातील नोंदणीकृत खाजगी दवाखान्यात १५ दिवसाचा आत रुग्ण हक्कांची सनद ( द चार्टर ऑफ पेंशट राईटस) ची माहिती तात्काळ दर्शनी भागात स्थानिक भाषेमध्ये लावण्यात यावी सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावे अशी तक्रार गफ्फार शेख यांनी केली होती

त्या अनुषंगाने चाळीसगाव वैद्यकिय अधिक्षक वर्ग-१ग्रामिण रुग्णालय,चाळीसगाव जि. जळगाव यांना संस्थेत व आपल्या कार्यक्षेत्रातील (चाळीसगांव शहरातील) खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रुग्णहक्काची सनद(द चार्टर ऑफ पेंशट राईटस) दर्शनी भागात १५ दिवसांच्यात आत लावण्याबाबत कार्यालयाकडून आदेशीत करावे व केलेल्या केला कार्यावाहीचा अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करावा असे जिल्हा शल्य चिकित्सक जळगांव यांनी एका परिपत्रक द्वारे कळविले असून होणाऱ्या विलंबास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे देखील पत्रकात म्हटले आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






