धरणगाव :- तालुक्यातील पाळधी येथे काल दि. 28/03/2023 रोजी रात्री 8:30 वाजता मोजे पाळधी ता. धरणगाव मधून श्री सप्तश्रृंगी देवी गड, वणी येथे जळगाव येथून दिंडी जात असतांना काही समाजकंटकांनी दिंडीवर दगडफेक केली. त्यामुळे दोन समाजातील गट आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली.होती. यामध्ये तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर विभागाचे प्रांतधिकारी श्री विनय गोसावी यांनी पाळधी येथे भेट दिली असता तणावपूर्ण शांतता होती.
परंतू एकंदरीत परिस्थिती पाहता स्वतः परिसरात फिरून तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजिवन सुरळीत रहावे याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली.
प्रांतधिकारी श्री विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) अन्वये पाळधी बु. व पाळधी खु. ता. धरणगाव येथे दिनांक 29/03/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपासून ते दिनांक 31/03/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपावेतो संचारबंदी आदेश लागू करीत आली आहे.

प्रांतधिकारी श्री विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती/ संस्था / संघटना यांचे विरूध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच आर्थिक वर्षाचा शेवट असल्या कारणाने गावातील सरकारी/खाजगी बँक / पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.
दरम्यान आज सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद होती गावात तणावपुर्ण शांततेचे वातावरण होते. गावात पोलीस रूट मार्च,करताना व ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






