जालना :- पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना अंबड शहरातील शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंडित भानुदास काळे असे मयताचे नाव आहे. घटनास्थळावरून तीन आरोपी फरार झाले आहे.
पंडित भानुदास काळे यांची मुलगी नंदा काळे हिचा विवाह आडूळ येथील संशयित किशोर शिवदास पवार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. त्यानंतर किशोर व नंदा या दोघांचे पटत नव्हते.
काही दिवसांपूर्वी ती पाचोड येथील एका व्यक्तीसोबत पळून गेली. त्यानंतर किशोर पवार हा नेहमी सासरा पंडित काळे यांना शिवागाळ करीत होता. माझ्या बायकोला नांदायला पाठावा, नाहीतर तुम्हाला बघून घेईल, असेही तो म्हणत होता. दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पंडित काळे व त्यांचा मुलगा पारलेश काळे दोघे घरी बसले होते. त्याचवेळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव व एक अनोळखी इसम तेथे आले.

त्यांनी पंडित काळे यांना मारहाण करून शिवागीळ केली. कंबरेची बंदूक काढून किशोर पवार याने पंडित काळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मंदाकिणी भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






