जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.
वृषभ :-
कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेमसौख्यात भर पडेल.
मिथुन :-
व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त पणे वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.
कर्क :-
सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.
सिंह :-
प्रेमिकांनी अती वाहत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.
कन्या :-
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट पणे सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.
तूळ :-
नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.
वृश्चिक :-
व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधी उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.
धनू :-
जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.
मकर :-
गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.
कुंभ :-
चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.
मीन :-
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






