मोठी बातमी : पहूर-शेंदुर्णी दरम्यान स्कूल बस उलटली; विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी,बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी

Spread the love

पहुर ( जामनेर ) :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर ते शेंदुर्णीच्या दरम्यान आज सकाळी स्कूल बर उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज , पहाटे सुमारे सात वाजेच्या सुमारास सरस्वती विद्या मंदिर या शाळेची क्रमांक दोनची बस उलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते यातील अंदाजे ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला ? स्कूल बस नेमकी कशी उलटली ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तथापि, अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भिती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते. तर, अपघातामध्ये जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार