प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर तालुक्यातील जवळच असलेल्या मारवड येथील असलेल्या ४१ वर्षीय युवकाने पोलीस वसाहतीच्या जुन्या निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली , तो १०८ वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता अशी माहिती निकटवर्तीय कडून मिळाली , प्रशांत दिलीप साळुंखे वय ४१ असे मृतकाचे नाव आहे.
सकाळी बस स्थानक परिसरात मित्रांसोबत सहजपणे गप्पा मारल्या नंतर एकटाच जुन्या पोलीस वसाहती कडे निघून गेला 12-30 ते 1 दरम्यान तेथील निंबाच्या झाडाला दोर बांधून प्रशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे अनेकांना मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने डॉक्टर विलास पाटील , शैलेश पाटील ,रवींद्र पाटील शरद पाटील यांनी धाव घेत प्रशांतचे शरीर खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ,तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

याबाबत डॉक्टर विलास वसंतराव पाटील यांच्या खबरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे , घटनास्थळी एपीआय जयेश खलाने ,पीएसआय विनोद पाटील ,हवालदार फिरोज बागवान ,पोलीस नाईक सुनील तेली यांनी पंचनामा केला , शवविच्छेदन होऊन रात्री उशिरा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले , मृत प्रशांत साळुंखे यांच्या पश्चात्य आई वडील ,पत्नी ,दोन मुली ,भाऊ व काका असा परिवार आहे , मृत प्रशांत हा १०८ वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम पाहत होता , मात्र त्याने आत्महत्या केल्याची उलटसुलट चर्चा सुरु होती , याबाबत पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे करीत आहेत.
हे देखील वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






