रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आंबेडकर गटाच्या जिल्हा अध्यक्ष पदी दिनेश राज निकुंभ व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख महेश खैरनार यांची नियुक्ती ……

Spread the love


धुळे :- दि. 30 मार्च रोजी नुकतीच रिपाई – आंबेडकर गटाचा केंद्रीय कार्यालय चेंबुर येथे आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे , राष्ट्रीय सचिव मा. मोहनलाल पाटील , प्रदेश महिला अध्यक्ष मा. सुनिता ताई चव्हाण , प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


या वेळी स्थानिक निवडणुका बाबत नियोजन, प्रत्येक जिल्ह्यात कामाची रूपरेषा कशी असावी व संपूर्ण महाराष्ट्रात महागाई विरोधात रिपब्लीकन पार्टीचे एकाच दिवशी मोठया प्रमाणात आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले.


यावेळी विविध पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यात धुळे जिल्हा अध्यक्ष पदी दिनेश राज निकुंभ यांची व धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख महेश खैरनार यांची संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी स्वप्निल मोहिते , किशोर कुवर , विशाल कटारे उपस्थित होते.
या कार्यकर्त्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार