एरंडोल आठवडे बाजार परिसरात गांजाची खुलेआम विक्री,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

Spread the love

एरंडोल :- येथील आठवडे बाजार परिसर, पाताळनगरी परिसर या भागात गांजाची खुलेआम विक्री केली जात असून पोलिसांनी याकडे त्वरित लक्ष घालून गांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपालिकेतर्फे अंजनी नदीच्या काठावर सुमारे चार कोटी रुपये खर्च करून सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक डिजिटल आठवडे बाजाराचे बांधकाम करण्यात आले आहे.

सदर आठवडे बाजारातील गाळ्यांचे लिलाव झाले असले तरी अद्यापपर्यंत याठिकाणी कोनाठाई व्यवसाय सुरु झालेला नाही.सदर आठवडे बाजार परिसरात गांजा व भांग यासारख्या नशीली पदार्थांची विक्री खुलेआमपणे करण्यात येत असल्यामुळे याठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील युवक गांजा व भांग खरेदी करण्यासाठी येत असतात.यामध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.गांजा व भांग विक्रेत्यांवर कोणाचाही धाक नसल्यामुळे ग्राहकांमध्ये कायम वाद होत असतात.

युवक वर्ग हा गांजा व भांग यासारख्या नशीली पदार्थ्यांच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकले आहेत.याच परिसरात महादेवाचे मंदिर असून याठिकाणी दररोज महिला व पुरुष दर्शनासाठी येत असतात.तसेच गांधीपुरा,कॉलेज,म्हसावद रस्त्यावरील नवीन वसाहती याभागात जाण्यासाठी नागरिकांकडून याच मार्गाचा वापर केला जात असतो.

पाताळनगरी परिसरातील एका गल्लीत देखील गांजाची विक्री केली जात असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.सदर गांजा विक्रेत्यांकडे स्थानिक पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तसेच स्थानिक पोलिसांनी गांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करून गांजा विक्री बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार