कोल्हापूर :- जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये माजी सरपंच पत्नीने आपल्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुप्रिया बाजीराव वाडकर (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील (वय 59, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मृत सुप्रिया यांचे पती बाजीराव वाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सुप्रिया यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले कि पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता.

यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली.
बाजीरावचा शनिवारी वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी आपले पती बाजीराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बाजीराव हे काही कामानिमित्त बाहेरगावी निघून गेले.
यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून सुप्रिया यांनी आपल्या राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






