Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खाजगी प्रश्न असतो. घरच्यांचा पसंतीने म्हणजे अँरेज मॅरेज (marriage Video) अनेक जण करतात. तर काही जण लव्ह मॅरेज करतात.असे अनेक जण असतात ज्यांना आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर लग्न करता येतं नाही. अशावेळी प्रियकर प्रेयसी (Bride Groom Viral Video) पळून जातात, काही टोकाचे पाऊल उचलतात. तर काही लोक घरच्यांचा विरोधाला समोरे जावून पोलिसांकडे दाद मागतात. (Bride Groom wedding video)
नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये…
एक नववधूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नटून थटून एक नववधू थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिचा पोलीस स्टेशनमधील व्होल्टेज ड्रामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती कोणालाही ऐकत नाही आहे.
नववधू धिंगाणा घालण्यामागे कारण की..?
तुम्हाला प्रश्न पडला असेल नववधूने पोलीस स्टेशनमध्ये एवढा धिंगाणा का घातला ते…मिळालेल्या माहितीनुसार नवविवाहित तिच्या प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती. या व्हिडीओमध्ये ती म्हणताना दिसतं आहे. ”दो शादी करेंने दो”

धक्कादायक कृत्य !
या व्हिडीओमध्ये नववधू दारूच्या नशेत असल्याने गोंधळ घालत असल्याचं दिसतं आहे. तिथल्या महिला कॉन्स्टेबल तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असताना ती कागदपत्रे आणि मोबाईल फोन फेकतानाही दिसत आहे. लाल आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केलेल्या वधूला नंतर एका महिला हवालदाराने खोलीत ओढताना दिसतं आहे.
कुठलीही आहे घटना?
ही घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. तर हा व्हिडीओ दीपिका नारायण भारद्वाज यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत 268 पेक्षा जास्त रिट्विट्स आणि कोट रिट्विट्ससह 39K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






