दादा अमृतसर एक्सप्रेसच्या थांब्याकरिता निंभोरा नागरिकांचे रावेर लोकसभा खासदारांकडे साकडे

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी: परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा स्टेशनला दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत चालू व्हावा याकरता रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे यांच्या कोथळी गावी निवासस्थानाला निंभोरा ग्रामस्थ निवेदन देण्याकरता गेले असता खासदार रक्षाताई खडसे यांना बंद पडलेला दादर अमृतसर पठाणकोटचा थांबा सुरू करण्यात यावा यासाठी निंभोरा ग्रामस्थांनी या मागणीला जोर धरून खासदार रक्षाताई खडसेंना त्यांच्या निवासस्थानी जाऊन साकडे घातले या आधी पण खासदार खडसे ताईंना निंभोरा ग्रामस्थांनी या मागणी करता निवेदन दिले होते परंतु नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या या मतदारसंघातील खासदारांकडे या थांब्याची जोरदार मागणी केली आहे ग्रामस्थांचे खासदारांना असे म्हणणे आहे की आम्ही आपल्याला नवीन गाडी सुरू करण्याची मागणी करत नाही हा एक्सप्रेस चा थांबा सुरुवातीपासून दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस सुरू झाल्यापासून चा आहे परंतु रेल्वे प्रशासनाने दोन-तीन वर्षापासून कोरोना काळात हा थांबा बंद केला त्यामुळे मुंबई मनमाड नाशिक दिल्ली भोपाल जाणाऱ्या प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे निंभोरा स्टेशनवर आज रोजी फक्त अलाहाबाद इटारसी भुसावल ही मेमो गाडी सुरू झालेली आहे परंतु ही मेमो गाडी पण अवेळेवर धावत आहे .

त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहे तरी खासदारांनी या मागणीची गंभीर दखल घेऊन निंभोरा ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे यावेळी खासदारांना आपल्या या समस्यांचा पाढा वाचून ग्रामस्थांनी खासदार ताईंना कोथळी गावच्या निवासस्थानी सहिनिशी आपले निवेदन दिले या निवेदनावर निंभोरा येथील ग्रामस्थ प्रल्हाद बोंडे नरेंद्र ढाके गिरधर भंगाळे मोहन बोंडे रवी भोगे विष्णू भिरूड सूर्यभान भिरूड सर नितीन भंगाळे गुणवंत भंगाळे प्रमोद भंगाळे विजय बोंडे गिरीश नेहते पप्पू कोळंबे सर मनोहर तायडे सुनील कोंडे परमानंद शेलोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार