कालीपुत्र कालीचरण यांच घोसला येथे प्रवचन व दर्शन सोहळा…मराठा प्रतिष्ठाणचे आयोजन

Spread the love

सोयगाव, दि.०३..घोसला ता सोयगाव येथे सकल हिंदू समाज व मराठा प्रतिष्ठानच्या वतीने काली पुत्र काली चरण महाराज यांच्या प्रवचन व दर्शन सोहळा व शिवतांडव स्तोत्र वाचन भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी( दि.०५) सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहिती आयोजक सोपान गव्हांडे अध्यक्ष मराठा प्रतिष्ठाण यांनी दिली आहे

दरम्यान या कार्यक्रमासाठी दोन एकर मैदानावर तब्बल वीस हजार नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आल्या ची माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे सोमवारी मराठा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मैदानाची पाहणी केली असून पूर्वतयारी पूर्ण झाली आहे कार्यक्रमासाठी वीस ते पंचवीस हजार नागरिक येणार असल्याचे दावा आयोजक समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

सोयगाव तालुका व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दर्शन व सोहळाच्या लाभ घ्यावा असे आवाहन मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे यांनी केले आहे.

टीम झुंजार