खानदेश पुत्र उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव, संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची घेतली दखल

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर

मूळ अमळनेर येथील रहिवासी असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास(संजय)महाले यांनी सेवा बजावत असताना छंद म्हणून संगीत विषयक आवड जपली .संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान दिले. त्यात अनेक अभूतपूर्व व अनेकार्थी ” हटके ” संगीतमय कार्यक्रम सादर केले. त्यात काही प्रयोग तर अक्षरशः स्वप्नवत तथा अकल्पनीय होते. या एकूणच कार्याची आणि संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत श्री.महाले यांना दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने “संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. श्री.महाले यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे झाले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे ते लहान बंधू आहेत.

दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि नातसून मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते १ एप्रिल रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे समारंभ पूर्वक श्री. महाले यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, तैलचित्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध संगीतकार तथा गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सलील कुलकर्णी, जयदीप बगवाडकर, केतकी भावे-जोशी यांनी एकाहून एक सुरेल गीत सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका गौतमी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

हे देखील वाचा

टीम झुंजार