पारोळा l प्रतिनिधी
पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील एरंडोल मतदारसंघात नदीजोड प्रकल्पात अंतर्गत रखडलेल्या चार प्रकल्पांच्या कामांसाठी बारा कोटी दहा लक्ष 30 हजार रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे. शिवसेना कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख मधुकर पाटील, माजी सभापती अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष सखाराम चौधरी आदी उपस्थित होते.
आमदार चिमणराव पाटील म्हणाले की जामदा डावा कालवा पारोळा शाखा की. मी. 21 सा. क्र 20 715 मीटर पासून नगाव ते पळासखेडा सिम नालापर्यंत भरण कालव्याच्या कामास 4 कोटी 69 लक्ष, सारवे नालाभरण कालवेचे कामास 1 कोटी 80 लाख 14 हजार रुपये, जामदा डावा कालवा शाखा पारोळा पासून खोलसर भरण कालव्यासाठी 4 कोटी 79 लक्ष 87 हजार रुपये तर एरंडोल तालुक्यातील भातखेडे निपाणी मायनर पासून ल पा तलाव खडसेसिमच्या नाल्यापर्यंत भरण कालव्याच्या कामासाठी 81 लक्ष 28 हजार रुपये असे एकूण बारा कोटी दहा लक्ष तीस हजार रुपयांच्या कामांना सुधारीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

ही कामे मार्गी लागल्यानंतर त्या त्या प्रकल्प अंतर्गत हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा यामुळे फायदा होणार आहे. तसेच या प्रकल्पावर अंतर्गत अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टंचाई ची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या कामांना लवकरच सुरुवात करून हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचेही माहिती आ चिमणराव पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील भोंडन ते टिटवी ही रखडलेल्या पाटचारी व इतर पाठचाऱ्यांच्या कामांना देखील सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात पाठपुरावा हा सुरू आहे.

या प्रकल्पांना मिळालेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा अडचणी दूर होतील व त्यांचे अधिक शेतजमीन भिजणार असल्याने याचा आनंद होत असल्याचे यावेळी पाटील यांनी मत व्यक्त केले. राज्य शासन डीपीडीसी हेडकडे हा निधी वर्ग करून त्या अंतर्गत हे काम होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान या कामांचा नगाव सिम, पळासखेडा, बाहुटे, सारवे,मोरफळ मोरफळी तर एरंडोल तालुक्यातील गालापूर, भातखेडा, निपाने या शिवारातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक सिंचनाचा फायदा होणार आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक