नंदूरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आंब्याच्या बागेत पोलीस पोहोचल्यावर पोलीसही चक्रावले. नंदुरबारच्या धडगावात गांजाची शेती करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४५ लाख ३९ हजार ५०० रुपये किमतीच्या ६५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका व्यक्तीने आंब्याच्या वनराईजवळ गांजाची बेकायदेशीर गांजा लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाहणी केली असता पोलिसांना पाहताच संबंधित आरोपीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता ६५० किलो वजनाचे एकूण ४७९० गांजाची झाडे आढळून आली. आरोपी रूपजा सिंगा पाडवी यांच्यावर कारवाई केली असून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी, राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोलीस नाईक शशिकांत वसईकर, दिपक वारुळे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, विनोद पाटील, रितेश बेलेकर, गणेश मराठे, जानसिंग वळवी, सायसिंग पाडवी, प्रतापसिंग गिरासे, सुनिलकुमार सुर्यवंशी यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक